Thursday, April 14, 2022

NEET (UG) Exam 2022 | NEET प्रवेश परिक्षा 2022 | पहा परिक्षेचे स्वरूप, वेळापत्रक, ऑनलाईन अर्जाचा अंतिम दिनांक

  


देशभरात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या NEET परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि याबाबतच राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत NEET (UG) 2022 परीक्षेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे आणि या परीक्षेकरीता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत

NEET 2022 परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमधून 200 मल्टिपल चॉइस म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील ज्यामध्ये प्रत्येक विषयातील 50 प्रश्नांची विभागणी A आणि B अशा दोन विभागांमध्ये केली जाईल.

NEET परीक्षा ही इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, आणि उर्दू अशा 13 भाषांमध्ये घेतली जाईल.

या परीक्षेकरीता ऑनलाईन अर्ज दिनांक 6 एप्रिल 2022 पासून सुरू झाले असून 6 मे 2022 रात्री 11:50 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तसेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर परीक्षा फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय, पेटीएम द्वारे भरण्याकरिता 7 मे 2022 रात्री 11:50 पर्यंत आपण भरू शकता

NEET परीक्षेकरीता जी परीक्षा फी आपणास भरायची आहे त्यामध्ये जनरल प्रवर्गाकरिता 1600/-, ईडब्ल्यूएस अथवा ओबीसी प्रवर्गाकरिता 1500/-, एससी एसटी पीडब्ल्यूडी अथवा थर्ड जेंडर प्रवर्गाकरिता 900/- परीक्षा फी आपणास भरावी लागेल

NEET 2022 ही परीक्षा 17 जुलै 2022 रोजी रविवारला दुपारी 2 ते 5 या वेळेत घेण्यात येईल NEET Exam Book Store.

 

NEET Exam Preparation Books - Click Here

अधिकृत संकेतस्थळ - Click Here

परिपत्रक (English) - Click Here

परिपत्रक (हिंदी) - Click Here

हीच माहिती Video स्वरूपात - Click Here

मोफत गेम खेळा पैसे जिंका - Click Here

 

No comments:

Post a Comment

फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...