Tuesday, November 2, 2021

सावधान व्हाट्सअपने महिनाभरात बंद केले 22 लाख अकाउंट, या चुका करू नका अन्यथा व्हाट्सअप होईल बंद!

 


कंपनीच्या नियमाप्रमाणे बेकायदेशीर, अश्लील, मानहानीकारक, घाबरवणारे, धमकी देणारे, समाजात वैर निर्माण करणारे, त्रास देणारे, जातीय-धार्मिक भेदभाव निर्माण करणारे मेसेज वा मजकूर शेअर केला तर ते अकाऊंट बद करण्यात येते.
याशिवाय जर व्हॉट्सअपच्या अटी आणि नियमांचा भंग केल्यासही अकाऊंट बंद करण्यात येते. या वरील नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली, तर तुमचे व्हाट्सअप अकाऊंट सुरक्षित राहू शकते.

इंस्टंट मेसेजिंग एप व्हॉट्सअप त्यांनी घेतलेल्या एका नव्या निर्णयामुळे सध्या चर्चेत आहे. व्हॉट्सअपने २२ लाख अकाऊंट बंद केले आहेत. कंपनीच्या मासिक अहवालात ही बाब समोर आली आहे. ज्या वापरकर्त्यांनी नियमांचे पालन केले नाही, नियम तोडले, त्यांचे अकाऊंट बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

यूझर्सच्या तक्रारींवरही कारवाई


ज्या यूझर्सनी नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यांची अकाऊंट बंद करण्यात आली आहेत. सर्व यूझर्सच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हॉट्सअपच्या य़ूझर्स सेफ्टी रिपोर्टवरुन २२ लाख ९ हजार अकाऊंट बंद करण्यात आली आहेत. ज्यांनी या प्लॅटफॉर्मचा चुकीचा वापर केला, तसेच ज्यांच्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या त्या यूझर्सची खाती बंद करण्यात आली आहेत.

तुम्ही तुमचे अकाऊंट कसे सुरक्षित ठेवाल


कंपनीच्या नियमाप्रमाणे बेकायदेशीर, अश्लील, मानहानीकारक, घाबरवणारे, धमकी देणारे, समाजात वैर निर्माण करणारे, त्रास देणारे, जातीय-धार्मिक भेदभाव निर्माण करणारे मेसेज वा मजकूर शेअर केला तर ते अकाऊंट बद करण्यात येते. याशिवाय जर व्हॉट्सअपच्या अटी आणि नियमांचा भंग केल्यासही अकाऊंट बंद करण्यात येते. या वरील नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली, तर तुमचे व्हाट्सअप अकाऊंट सुरक्षित राहू शकते.

No comments:

Post a Comment

फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...