Saturday, November 6, 2021

IOCL इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 338 जागांसाठी पदभरती

 इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 338 जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.


 

अप्रेंटिस पदसंख्या : 338

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात डाउनलोड करा या बटनावर क्लिक करून पहा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १३ नोव्हेंबर २०२१


 

IBPS मार्फत १८२८ जागांसाठी पदभरती

IBPS मार्फत विविध बँकांमध्ये विशेष अधिकारी पदांच्या 1828 जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

 

 पदाचे नाव : आय.टी. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी आणि विपणन अधिकारी 

शैक्षणिक पात्रता :  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक

अर्ज करण्याचा दिनांक : २३ नोव्हेंबर २०२१

 

Tuesday, November 2, 2021

B.E. / B. Tech प्रवेश प्रक्रिया 2021-22


 

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये B.E. / B. Tech प्रवेशाकरिता पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

 

शैक्षणिक पात्रता :- 

1) 45% गुणांसह 12वी उत्तीर्ण (विज्ञान) किंवा 45% गुणांसह डिप्लोमा (मागासवर्गीय / PWD : 40% गुण)

2) MHT-CET 2021 / JEE(Main)

 

फी :-

 General: ₹800/-   (SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC, EWS & PWD: ₹600/-)

 

 ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १८/११/२०२१(५.०० पर्यंत)


अधिकृत संकेतस्थळ : https://cetcell.mahacet.org/


राशन कार्ड धारकांसाठी मोफत आरोग्य विमा सेवा

 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना


 

या योजनेच तपशील खालीलप्रमाणे:

१.लाभार्थी :- अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळ्या, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न) शिधापत्रिकाधारक कुटुंबे तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील  सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत

२. विमा संरक्षण: या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष रुपये १.५० लाखापर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे.मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष २.५० लाखापर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबासाठी कोणत्याही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तीना वरील योजनेचा लाभ घेता येतो.  

३. योजनेत समाविष्ट उपचार: योजनेंतर्गत ३० विशेष सेवांतर्गत ९७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. सदर योजनेत खालीलप्रमाणे विशेष सेवांतर्गत उपचार/ सेवा देण्यात येत आहेत.

  • सर्वसाधारण शस्त्रक्रिया
  • काम, नाक घसा शस्त्रक्रिया
  • नेत्ररोग शस्त्रक्रिया
  • स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र
  • अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
  • पोठ व जठार शस्त्रक्रिया  
  • कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
  • बालरोग शस्त्रक्रिया
  • प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया
  • मज्जातंतूविकृती शास्त्र
  • कर्करोग शस्त्रक्रिया
  • वैद्यकीय कर्करोग उपचार
  • रेडीओथेरपी कर्करोग
  • त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
  • जळीत
  • पॉलिट्रामा
  • प्रोस्थेसिस
  • जोखिमी देखभाल
  • जनरल मेडिसिन
  • संसर्गजन्य रोग 
  • बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
  • हृदयरोग
  • नेफ्रोलोजी
  • न्युरोलोजी
  • पल्मोनोलोजी
  • चर्मरोग चिकित्सा
  • रोमेटोलोजी
  • इंडोक्रायनोलोजी
  • मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी
  • इंटरवेन्शनल रेडीओलोजी

 

४. विम्याचा हप्ता- या योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विमाच्या हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्सुरंस कंपनीस अदा करण्यात येतो

. योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये – या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय/निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रूग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे. लाभार्थी यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात घेऊ शकतो.

६. नि:शुल्क (Cashless Medical Services):-  सदर योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून निशुल्क वैद्यकीय सेवा देण्यात पूर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना त्यांचेकडील शुभ्र शिधापत्रिका व ७/१२  उतारा आणि फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांतील उपचार निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर १० दिवसापर्यंतच्या सेवा पँकेज मध्ये समाविष्ट आहेत.

७. आरोग्य मित्र:- अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णाची नोंदणी, उपचारा दरम्यान सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्र उपलब्ध आहेत.

८ आरोग्य शिबीर:- योजेनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घेण्याकरिता अंगीकृत रुग्णालयांमार्फत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबिरांत रुग्णांची तपासणी करून योजनेतील ९७१ उपचारापैकी उपचारांस सदर रुग्ण पात्र ठरल्यास त्यावर योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचार केले जातात.

९. राज्य आरोग्य हमी सोसायटी व नियामक परिषद:- योजनेच्या दैनंदिन कामकाजाचे सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात तसेच यावर नियंत्रक म्हणून मा. मुख्य मंत्री. राज्य यांच्या अध्यक्षतेखाली नियामक परिषद कार्यरत आहे.

१० विमा कंपनी आणि व तृतीय पक्ष प्रशासकीय कंपन्या:- योजनेची राज्यात अमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्सुरंस कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्याची (TPAs) निवड केलेली असून त्यांचा मार्फत अंगीकृत रुग्णालयांची निवड, उपचारांच्या पूर्व परवानगीची तपासणी करणे, दाव्यांची तपासणी करणे, आरोग्य मित्राची तसेच राज्य व जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे ह्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडण्यात येतात.

११ मदतीसाठी संपर्क :-

  • टोल फ्री क्रमांक:-  १५५३८८/ १८००२३२२००
  • रुग्णालय- आरोग्य मित्र
  • पोस्ट बॉक्स – पो.बॉक्स क्र. १६५६५, वरळी पोस्ट ऑफिस

             वरळी मुंबई – ४००००१८

 

सावधान व्हाट्सअपने महिनाभरात बंद केले 22 लाख अकाउंट, या चुका करू नका अन्यथा व्हाट्सअप होईल बंद!

 


कंपनीच्या नियमाप्रमाणे बेकायदेशीर, अश्लील, मानहानीकारक, घाबरवणारे, धमकी देणारे, समाजात वैर निर्माण करणारे, त्रास देणारे, जातीय-धार्मिक भेदभाव निर्माण करणारे मेसेज वा मजकूर शेअर केला तर ते अकाऊंट बद करण्यात येते.
याशिवाय जर व्हॉट्सअपच्या अटी आणि नियमांचा भंग केल्यासही अकाऊंट बंद करण्यात येते. या वरील नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली, तर तुमचे व्हाट्सअप अकाऊंट सुरक्षित राहू शकते.

इंस्टंट मेसेजिंग एप व्हॉट्सअप त्यांनी घेतलेल्या एका नव्या निर्णयामुळे सध्या चर्चेत आहे. व्हॉट्सअपने २२ लाख अकाऊंट बंद केले आहेत. कंपनीच्या मासिक अहवालात ही बाब समोर आली आहे. ज्या वापरकर्त्यांनी नियमांचे पालन केले नाही, नियम तोडले, त्यांचे अकाऊंट बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

यूझर्सच्या तक्रारींवरही कारवाई


ज्या यूझर्सनी नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यांची अकाऊंट बंद करण्यात आली आहेत. सर्व यूझर्सच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हॉट्सअपच्या य़ूझर्स सेफ्टी रिपोर्टवरुन २२ लाख ९ हजार अकाऊंट बंद करण्यात आली आहेत. ज्यांनी या प्लॅटफॉर्मचा चुकीचा वापर केला, तसेच ज्यांच्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या त्या यूझर्सची खाती बंद करण्यात आली आहेत.

तुम्ही तुमचे अकाऊंट कसे सुरक्षित ठेवाल


कंपनीच्या नियमाप्रमाणे बेकायदेशीर, अश्लील, मानहानीकारक, घाबरवणारे, धमकी देणारे, समाजात वैर निर्माण करणारे, त्रास देणारे, जातीय-धार्मिक भेदभाव निर्माण करणारे मेसेज वा मजकूर शेअर केला तर ते अकाऊंट बद करण्यात येते. याशिवाय जर व्हॉट्सअपच्या अटी आणि नियमांचा भंग केल्यासही अकाऊंट बंद करण्यात येते. या वरील नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली, तर तुमचे व्हाट्सअप अकाऊंट सुरक्षित राहू शकते.

Monday, November 1, 2021

जाणून घ्या, FSSAI म्हणजे काय? अन्नपदार्थाविषयीच्या तक्रारी कशा करायच्या, कोणती कारवाई होते

 हॉटेल बेकरी व इतर सर्व खाद्य व्‍यावसायीक असो किंवा ज्‍या ठिकाणी खाण्‍याचे पदार्थ विकले जातात किंवा ठेवले जातात त्‍या सर्वांना FSSAI या लायसन्‍सची आवश्‍यकता असते. फूड व्यवसाय हा चांगला उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने हॉटेल व्यवसायाचा वाटा मोठा आहे. मात्र तुम्ही कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ विकत असाल किंवा हॉटेल किंवा खाद्यगृह सुरु कराल तेव्हा प्रत्यक्ष रीतसर कायद्याने नोंदणी करणेही महत्वाचे व बंधनकारक आहे. चला तर मग जाणून घेऊयात FSSAI म्हणजे काय? त्याबद्दल अधिक माहिती


FSSAI म्हणजे काय?

आपल्या सर्वांना माहीतच आहे की, FSSAI भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. जे पदार्थ खाण्यासाठी वापरले जातात त्या प्रत्येक पदार्थांची विक्री करण्यापूर्वी त्यांची विक्री करण्याची परवानगी केंद्र सरकारने सक्तीची केलेली आहे, अशा परवानगी शिवाय कोणतेही खाद्यपदार्थ विकणे,साठविणे,उत्पादन करणे बेकायदेशीर असून अशी बेकायदेशीर कृती करणारांवर गुन्हेही दाखल होऊ शकतात.यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरण (FSSAI) हे खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना देवू करतात. तसेच एक चौदा अंकी नोंदणी/परवाना क्रमांक पॅकिंग छापलेले किंवा व्यवसायाच्या आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

अन्नपदार्था विषयीच्या तक्रारी कुठे आणि कशा करायच्या?

सणासुदीच्या काळात मिठाई व इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करुन लोकांच्या जीवाशी खेळतात. यासाठी या भेसळयुक्त पदार्थ बनवणार्‍या व विकल्या जाणार्‍यांवर योग्य कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन ही संस्था महाराष्ट्र राज्य शासन यांच्या कडून ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे.

अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. अन्न व औषध प्रशासनची स्थापना १९७० रोजी महाराष्ट्र राज्य शासना राज्यातील नागरिकांचे भेसळयुक्त व अयोग्य अन्नपदार्थ व औषधांपासून संरक्षण करण्यासाठी केली. महाराष्ट्रात विकली जात असलेली औषधे तसेच खाद्यपदार्थ व पेये भेसळमुक्त तसेच नागरिकांसाठी वापरण्यास सुरक्षित आहेत ह्याची खबरदारी घेण्याची जबाबदारी ह्या संस्थेची आहे.

तक्रार कशी दाखल करावी?

तक्रार दाखल करण्‍याची आणि दाद मिळविण्‍याची कार्यपध्‍दती अत्‍यंत सोपी व वेगवान आहे. या करिता तुम्ही उचित मंच/ आयोग यांच्‍याकडे ग्राहकाला आपली लेखी तक्रार आवश्‍यक प्रतीसह प्रत्‍यक्ष किंवा टपालाने पाठविता येते. तक्रार करण्‍यासाठी वकिलाच्‍या मदतीची गरज असतेच असे नाही.

अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणार्‍यांवर कोणती कारवाई होती?

अन्नामध्ये इतर पदार्थांची भेसळ करण्याचे प्रमाण वाढले. अन्नभेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने ‘अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा-१९५४’, अंमलात आणला आहे. इ.स. १९५५ पासून या कायद्यातील त्रुटी घालवून व योग्य त्या तरतुदी करून त्याची सर्व राज्यांत अंमलबजावणी करण्यात आली आहे. आरोग्याला हानिकारक अशा भेसळीबाबत न्यायालयात खटले दाखल करण्याची तरतूद या कायद्यात आहे. नवीन कायद्यात अन्न निरीक्षक ऐवजी अन्न सुरक्षा अधिकारी असे नमुने घेणार्‍या व संस्थांची तपासणी करणार्‍या अधिकार्‍याला संबोधले जाते. तसेच या अधिकार्‍यांकडून रु. १० लाखांपर्यंत दंड देखील ठोठवण्यात येतो. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ शिवाय अन्नपदार्थांवर नियंत्रणासाठी ऍगमार्क, बी.आय.एस., भारतीय दंड संहिता (कलम २७२, २७३) हे कायदे आहेत.

फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...