योजनेची पाश्वाभुमी
शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयीकृत बॅंका, सहकारी तसेच खाजगी बँका व पतपेढ्या मार्फत मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जातो यामध्येही शेतकऱ्यांचा कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जास्त असतो सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यामार्फत कर्जाचे वितरण केले जाते सर्वसाधारणपणे शेतकरी नवीन पीक कर्ज मध्यम व दीर्घ मुदतीचे घेतो हे कर्ज घेतो.
हे कर्ज घेत असताना शेतकऱ्याला सातबारा उतारा पासून ते बँकांचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा करावी लागतात यासाठी बराच कालावधी लागतो व कधी कधी तर हंगाम संपूनही जातो केवळ कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत भावी त्या शेतकऱ्याला वेळेवर कर्ज मिळत नाही. मग त्याला खाजगी सावकाराकडून जास्तीचा व्याजाने कर्ज घ्यावे लागते.
शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज मिळविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषिकर्ज मित्र योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
योजनेचा उद्देश
शेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजपणे व विनाविलंब होण्या करिता सहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास साधणे या उद्देशाला समोर ठेवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
योजनेचे स्वरूप
काही शेतकरी कर्ज घेतल्यानंतर त्याच्या मुदत वेळेमध्ये कर्जाची परतफेड करत असतात आणि नियमितपणे कर्ज उचलत असतात पण काही वेळेला या शेतकऱ्यांना कागदपत्रांना भावी कर्ज मिळण्यास उशीर होतो. त्यामुळे त्यांच्या खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी तेवढ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होताना दिसत नाही व त्यांचे नुकसान होते. हा विचार समोर ठेवून शेतकरी कर्ज मित्र ही योजना कृषी कर्ज मित्र यांच्यामार्फत लवकरात लवकर वित्तपुरवठा होण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना योग्य वेळेमध्ये कर्ज पुरवठा होण्यास मदत होईल.
कृषि कर्ज मित्र नोंदणी
- कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
- नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
- जिल्हा परिषदेकडील कृषी समिती अंतिम निवडीचे अधिकार राहतील.
कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे त्यांची भेट घेऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती त्यांना द्यावी. कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून, शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून, मंजुरीसाठी ते बँकेमध्ये सादर करतील. कृषिकर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्या मधील मध्यस्थांच्या भूमिकेत ऐवजी सहाय्यक व सल्लागाराची भूमिका पार पाडेल.
कृषी कर्ज मित्र योजनेची कार्यपद्धती
कृषी कर्ज मित्र शेतकऱ्यांचा शिफारशीसह सेवाशुल्क मागणी यादी बँकेकडे सादर करेल, बँकेकडून त्याची शहानिशा करून बँक व त्या गटातील गट विकास अधिकारी यांच्याकडे सेवा शुल्क अदा करण्यासाठी यादी सादर करेल.
कृषी कर्ज मित्राची कार्यपद्धती
कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे त्यांची भेट घेऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती त्यांना द्यावी. कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून, शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून, मंजुरीसाठी ते बँकेमध्ये सादर करतील. कृषिकर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्या मधील मध्यस्थांच्या भूमिकेऐवजी सहाय्यक व सल्लागाराची भूमिका पार पाडेल, यातून कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.
योजनेचा शासन निर्णयाची Video Link
पहा शासन निर्णय
No comments:
Post a Comment