आधारकार्ड म्हणजे प्रत्येक माणसाची एक ओळख झाली आहे. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असो किंवा मोबाईलचे सिम कार्ड घ्यायचे असेल आधारकार्ड लागतेच. कोणतेही काम करताना एकवेळ इतर कागदपत्रे कमी असतील तर चालतील पण सोबत आधारकार्ड लागतेच. बऱ्याच वेळा स्काॅलशिप चा फाॅर्म,बॅंकेत नविन खाते, पेन्शन योजना अशा ठिकाणी आधार कार्ड किंवा झेराॅक्स हरवण्याची दाट शक्यता आहे. ही काॅफी जर चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली तर याचा दुरुपयोग होण्याची दाट शक्यता आसते. तुमच्या सोबत अस काही झाले असेल तर घाबरू नका. काही मिनिटातच तुम्ही शोधू शकता तुमचे आधारकार्ड चा कसा वापर झाला आहे. याशिवाय काही शंका वाटत असेल तर तुम्ही तक्रार ही नोंदवू शकता. जाणून घ्या नेमकी काय आहे याची प्रक्रिया..
आधारवर आपले नाव, पत्ता, संपर्क नंबर आणि फिंगर प्रिंट असतात. तुम्हाला जर अशी शंका निर्माण झाली असेल तर uidai या बेबसाईटची मदत घेऊ शकता. यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. घर बैठे तुम्ही याची माहिती मिळवू शकता. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
तुमचे आधार कोठे कोठे वापरले गेले आहे. याची माहिती काही सेकंदाताच तुम्हाला मिळू शकते. यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआईडीएआई) ने आधार कार्ड ला ही सुविधा मोफत दिली आहे. uidai.gov.in या वेबसाईटवर तुम्ही जाणून घेऊ शकता.
अशी पहा माहिती
सुरवातीला uidai.gov.in या वेबसाईटवर या. होम पेजवर ‘आधार सर्विसेज’वर क्लिक केल्यानंतर त्या पेजवर खालील बाजूला 'ऑथेंटिकेशन हिस्ट्री’हा पर्याय असेल. यावर क्लिक करा. तुम्हाला तुमचा आधारकार्ड नंबर आणि तुम्हाला समोरच दिलेला सिक्युरिटी कोड भरावयाचा आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे. त्यावर ओटीपी येईल. तो अॅड करा. यावर तुमचे डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल.
अशी करा तक्रार
तुम्हाला मिळालेल्या माहितीमध्ये जर काही गडबड वाटली तर यूआईडीएआई शी लगेच संपर्क करा. यासाठी टोल फ्रि क्रमांकावर १९६४ यावर संपर्क करू शकता. https://help@uidai.gov.in/ या मेल आयडी वर तुम्हाला आलेली शंका सागू शकता. याशिवाय https://resident.uidai.gov.in/file-complaint तक्रार नोंदवू शकता. घाबरू जाऊन नका. असे काही तुमच्यासोबत घडले तर याची मदत घेऊन वेळीच सावध होऊ शकता.
No comments:
Post a Comment