गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

पॅन-आधार लिंक करण्याबाबत मोठा निर्णय! 'फ्री सर्व्हिस' बंद, आता इतके पैसे लागतील

 

 

ज्यांनी अद्याप आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नाही, त्यांच्यासाठी एक चांगली आणि वाईट बातमी आहे. चांगली बातमी म्हणजे सरकारने आता पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे, पण त्याचबरोबर एक अटही घातली आहे, जी तुमच्या खिसा खाली करेल.

सरकारने एक वर्षाची मुदत दिली

जर तुम्ही पॅन-आधार लिंक केले नसेल, तर आता तुम्हाला हे काम करण्यासाठी एका वर्षाचा कालावधी मिळेल. सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. याबाबत आयकर विभागाच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस या संस्थेने पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख वाढवण्याबद्दल नोटिफिकेशन जाहिर केले आहे. याआधीही सरकारने पॅन-आधार लिंक करण्याची मुदत ३ वेळा वाढवली आहे.

पण आता ही सेवा मोफत मिळणार नाही

CBDT ने पॅन कार्डसोबत आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे, पण आधार-पॅन लिंक करण्याच्या कामासाठी 500 रुपये शुल्कही लागू केले आहे. 31 मार्च 2022 पर्यंत हे काम मोफत होत होते. 31 मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन लिंक झाले नसले तरीही पुढील एक वर्ष कोणत्याही अडचणीशिवाय पॅन कार्ड काम करत राहील. पण यादरम्यान, जर तुम्हाला आधार-पॅन लिंक करायचे असेल तर तुम्हाला ५०० रुपये द्यावे लागतील. या नवीन अटीनुसार, 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 दरम्यान, तुमचा पॅन-आधार लिंक करण्यासाठी 500 रुपये शुल्क भरावे लागेल आणि त्यानंतर याच कामासाठी 1,000 रुपये शुल्क भरावे लागतील.

 

पहा शासन परिपत्रक



 

गुरुवार, १० मार्च, २०२२

बांधकाम कामगार योजना फायदे, अटी, पात्राता व कागदपत्रे

 

बांधकाम कामगारांना रोजगार, त्यांची सुरक्षा, त्यांचे आरोग्य तसेच त्यांच्या कल्याणासाठी विविध उपाय योजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजनेची सुरुवात केली, या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील केली जाते.

बांधकाम कामगार योजनेचे फायदे

१. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त/आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता प्रतीकुटूंब ५,०००/- रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

२. नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी ३०,०००/- रूपये अनुदान दिले जाते.

३. नोंदणी केलेल्या स्त्री लाभार्थी बांधकाम कामगारांस तसेच नोंदणी केलेल्या पुरुष लाभार्थी बांधकाम कामगारांच्या पत्नीस २ जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५,०००/- रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २०,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

४. कामगाराने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १ लाख रुपये मुदत बंद ठेवचा लाभ दिला जाते.

५. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १ली ते ७वी मध्ये किमान ७५ टक्के किंवा अधिक उपस्थिती असल्यास २५००/- रुपये तसेच इयत्ता ८वी ते १०वी साठी प्रतिवर्षी ५०००/- रुपये  ७५ टक्के किंवा अधिक गुण असल्यास शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते.

६. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १०वी व इयत्ता १२वी मध्ये किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास १०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते.

७. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता ११वी व इयत्ता १२वी च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी १०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते.

८. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी २०,०००/- रुपये शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते.

९. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता १ लाख रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता रु. ६०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते.

१०. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी २००००/- रुपये आणि पदव्युतर पदवीका मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रती शैक्षणिक वर्षी २५,०००/- रुपये फक्त शासन्मान्य अभ्यासक्रमाकरिता आर्थिक सहाय्य दिले जाते.

११. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांस ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास २ लाख रुपये आर्थिक सहाय्य तसेच नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत २ लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ दिला जातो.

१२. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास १०.०००/- रुपये  त्याच्या अंत्यविधीसाठी मदत स्वरूपात दिली जाते.

१३. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस फक्त ५ वर्षांपर्यंत प्रतिवर्षी २४,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

१४. नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

१५. लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ १ लाख रुपये वैद्यकिय सहाय्य (एका सदस्यास केवळ एकदाच आणि कुटूंबातील दोन सदस्यांपर्यंत मर्यादित) तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेचा लाभ दिला जातो.

१६. संगणकाचे शिक्षण म्हणजेच MS-CIT चे शिक्षण घेत असलेल्या नोंदणीकृत लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना MS-CIT उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास MS-CIT शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात येते.

१७. घर बांधणी अथवा खरेदीसाठी बॅंकेकडुन घेतलेल्या कर्जावरील व्याजाची रक्कम रुपये ६ लाख अथवा २ लाख अनुदान दिले जाते.

१८. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल.

बांधकाम कामगार योजनेच्या अटी

  • १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • मागील १२ महिन्यामध्ये ९० दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत असणे आवश्यक
  •  या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.

बांधकाम कामगार योजनेच्या पात्रता

  • बांधकाम काम करीत असलेल्या बार बेंडर
  • वीटभट्टी कामगार
  • सुतार काम
  • सेंटरिंग
  • खोदकाम
  • वीज जोडणी (वायरमन)
  • अभाशी छत बसविणारा
  • फिटर
  • मदतनीस
  • अंतर्गत सजावट करणारा
  • हेवी इंजी. कन्स्ट
  • संगमरवर व कड्प्याची कामे करणारा
  • गवंडी
  • बांधकामाच्या ठिकाणी मिक्सर किंवा रोलर चालविणारा
  • मिक्सर किंवा यंत्रचालक
  • मोझेक कामगार
  • पॉलिशिंग कामगार
  • नगरपालिकेचे गटारकाम करणारे
  • रंगकाम किंवा वार्निश करणारा
  • गटारकाम किंवा नळजोडणी काम करणारा
  • खाणकामगार किंवा मिक्सर (रोड साफिंग)
  • दगड कापणे, दगड फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणारे
  • थॅटचर किंवा लोहार किंवा सेवर किंवा कॉलर
  • बांधकामाच्या ठिकाणावरील सुरक्षा रक्षक
  • वेल्डर
  • बेल सिंकर
  • वूडन किंवा स्टोन पॅकर
  • समुद्राच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम करणारे
  • चुनाभट्टीचे काम करणारे
  • व इतर बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र आहेत

बांधकाम कामगार योजनेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट आकारातील 3 फोटो
  • अर्जदाराचा जन्म प्रमाणपत्र (जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
  • नियोक्त्याचे मागील वर्षभरात ९० दिवस किंवा ९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला
  • पॅन कार्ड
  • राशनकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड (राशनकार्डमधील सर्व सदस्यांचे)
  • मतदान ओळखपत्र
  • रहिवाशी पुरावा
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • ग्रामपंचायत ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • नोंदणी फी- रू. 25/- व वार्षिक वर्गणी रू.60/- (5 वर्षाकरिता) व मासिक वर्गणी रु.1/-

 

माहिती स्रोत :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ

अधिकृत सकेतस्थळ :- https://mahabocw.in/mr/

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

ई-श्रम कार्ड कोण बनवू शकतो आणि त्याचे फायदे, जाणून घ्या

 

ई-श्रम कार्ड योजना: श्रम आणि रोजगार मंत्रालयाने भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. ई-श्रमची अधिकृत वेबसाइट esharm.gov.in आहे. या संकेतस्थळावर असंघटित क्षेत्रातील कामगार ऑनलाइन नोंदणी करू शकतात आणि ई-श्रम कार्ड मिळवू शकतात. ई-श्रमसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) कार्ड मिळेल. कामगारांचा डेटा संकलित करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असून या पोर्टलद्वारे संकलित केलेल्या डेटाचा उपयोग नवीन कल्याणकारी योजना तयार करण्यासाठी आणि कामगारांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी केला जाईल.

ई-श्रम कार्ड योजना काय आहे?

भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक नवीन पोर्टल जारी केले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांची माहिती संकलित करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले. संकलित केलेल्या माहितीचा वापर कामगारांच्या हितासाठी नवीन धोरणे आणि धोरणे तयार करण्यासाठी केला जाईल. आता असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी करू शकतात. नोंदणीनंतर, कामगारांना ई-श्रम NDUW वेबसाइटवर मोफत विमा, आर्थिक मदत इत्यादीसारखे अनेक फायदे मिळतील.

ई-श्रम कार्ड नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. मोबाइल नंबर
  4. वारसाचे आधार कार्ड

ई-श्रम कार्डसाठी पात्रता

  1. अर्जदाराचे वय १६ वर्षांपेक्षा कमी आणि ५९ वर्षांपेक्षा जास्त नसावे
  2. EPFO/ESIC चा सदस्य नसावा
 

ई-श्रम कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो?

शेतकरी, शेतमजुर, सुतार, रेशीम उत्पादन कामगार, मीठ कामगार, वीटभट्टी कामगार, मच्छीमार, मिल कामगार, पशुपालन कामगार, लेबलिंग आणि पॅकिंग, इमारत आणि बांधकाम कामगार, लेदर कामगार, स्त्रीया, घरगुती कामगार, भाजीपाला आणि फळ विक्रेता, वर्तमानपत्र विक्रेता, रिक्षाचालक, मोलकरीण, रस्त्यावरील विक्रेते इत्यादी.

 

ई-श्रमकार्ड योजनेचे फायदे

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील मजुरांना अनेक फायदे देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आश्रम कार्डचे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत:-

  • मोफत विमा संरक्षण
  • आर्थिक मदत
  • सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभ  
 
कुठे करता येणार नोंदणी
 
ऑनलाइन नोंदणीसाठी कामगार ई-श्रम मोबाईल ॲप किंवा संकेतस्थळाचा वापर करू शकतात तसेच CSC (सामान्य सुविधा केंद्र), महा ई-सेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र आणि पोस्ट ऑफिसचे डिजिटल सेवा केंद्र इत्यादी ठिकाणी ही नोंदणी करता येऊ शकते

MHT CET 2022 Registration | एमएचटी-सीईटी 2022 साठी नोंदणीला सुरुवात करा ऑनलाईन अर्ज

 




शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

IOCL इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 338 जागांसाठी पदभरती

 इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 338 जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.


 

अप्रेंटिस पदसंख्या : 338

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात डाउनलोड करा या बटनावर क्लिक करून पहा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १३ नोव्हेंबर २०२१


 

IBPS मार्फत १८२८ जागांसाठी पदभरती

IBPS मार्फत विविध बँकांमध्ये विशेष अधिकारी पदांच्या 1828 जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

 

 पदाचे नाव : आय.टी. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी आणि विपणन अधिकारी 

शैक्षणिक पात्रता :  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक

अर्ज करण्याचा दिनांक : २३ नोव्हेंबर २०२१

 

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

B.E. / B. Tech प्रवेश प्रक्रिया 2021-22


 

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये B.E. / B. Tech प्रवेशाकरिता पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

 

शैक्षणिक पात्रता :- 

1) 45% गुणांसह 12वी उत्तीर्ण (विज्ञान) किंवा 45% गुणांसह डिप्लोमा (मागासवर्गीय / PWD : 40% गुण)

2) MHT-CET 2021 / JEE(Main)

 

फी :-

 General: ₹800/-   (SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC, EWS & PWD: ₹600/-)

 

 ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १८/११/२०२१(५.०० पर्यंत)


अधिकृत संकेतस्थळ : https://cetcell.mahacet.org/


माझी लाडकी बहीण योजना: 26 लाख लाभार्थ्यांवर मोठी छाननी सुरु! | Soham InfoSeva

  मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी महत्वाची ठरलेली  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागा...