Thursday, March 10, 2022

बांधकाम कामगार योजना फायदे, अटी, पात्राता व कागदपत्रे

 

बांधकाम कामगारांना रोजगार, त्यांची सुरक्षा, त्यांचे आरोग्य तसेच त्यांच्या कल्याणासाठी विविध उपाय योजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजनेची सुरुवात केली, या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील केली जाते.

बांधकाम कामगार योजनेचे फायदे

१. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त/आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता प्रतीकुटूंब ५,०००/- रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

२. नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी ३०,०००/- रूपये अनुदान दिले जाते.

३. नोंदणी केलेल्या स्त्री लाभार्थी बांधकाम कामगारांस तसेच नोंदणी केलेल्या पुरुष लाभार्थी बांधकाम कामगारांच्या पत्नीस २ जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५,०००/- रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २०,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

४. कामगाराने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १ लाख रुपये मुदत बंद ठेवचा लाभ दिला जाते.

५. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १ली ते ७वी मध्ये किमान ७५ टक्के किंवा अधिक उपस्थिती असल्यास २५००/- रुपये तसेच इयत्ता ८वी ते १०वी साठी प्रतिवर्षी ५०००/- रुपये  ७५ टक्के किंवा अधिक गुण असल्यास शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते.

६. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १०वी व इयत्ता १२वी मध्ये किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास १०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते.

७. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता ११वी व इयत्ता १२वी च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी १०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते.

८. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी २०,०००/- रुपये शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते.

९. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता १ लाख रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता रु. ६०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते.

१०. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी २००००/- रुपये आणि पदव्युतर पदवीका मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रती शैक्षणिक वर्षी २५,०००/- रुपये फक्त शासन्मान्य अभ्यासक्रमाकरिता आर्थिक सहाय्य दिले जाते.

११. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांस ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास २ लाख रुपये आर्थिक सहाय्य तसेच नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत २ लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ दिला जातो.

१२. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास १०.०००/- रुपये  त्याच्या अंत्यविधीसाठी मदत स्वरूपात दिली जाते.

१३. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस फक्त ५ वर्षांपर्यंत प्रतिवर्षी २४,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

१४. नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

१५. लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ १ लाख रुपये वैद्यकिय सहाय्य (एका सदस्यास केवळ एकदाच आणि कुटूंबातील दोन सदस्यांपर्यंत मर्यादित) तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेचा लाभ दिला जातो.

१६. संगणकाचे शिक्षण म्हणजेच MS-CIT चे शिक्षण घेत असलेल्या नोंदणीकृत लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना MS-CIT उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास MS-CIT शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात येते.

१७. घर बांधणी अथवा खरेदीसाठी बॅंकेकडुन घेतलेल्या कर्जावरील व्याजाची रक्कम रुपये ६ लाख अथवा २ लाख अनुदान दिले जाते.

१८. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल.

बांधकाम कामगार योजनेच्या अटी

  • १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • मागील १२ महिन्यामध्ये ९० दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत असणे आवश्यक
  •  या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.

बांधकाम कामगार योजनेच्या पात्रता

  • बांधकाम काम करीत असलेल्या बार बेंडर
  • वीटभट्टी कामगार
  • सुतार काम
  • सेंटरिंग
  • खोदकाम
  • वीज जोडणी (वायरमन)
  • अभाशी छत बसविणारा
  • फिटर
  • मदतनीस
  • अंतर्गत सजावट करणारा
  • हेवी इंजी. कन्स्ट
  • संगमरवर व कड्प्याची कामे करणारा
  • गवंडी
  • बांधकामाच्या ठिकाणी मिक्सर किंवा रोलर चालविणारा
  • मिक्सर किंवा यंत्रचालक
  • मोझेक कामगार
  • पॉलिशिंग कामगार
  • नगरपालिकेचे गटारकाम करणारे
  • रंगकाम किंवा वार्निश करणारा
  • गटारकाम किंवा नळजोडणी काम करणारा
  • खाणकामगार किंवा मिक्सर (रोड साफिंग)
  • दगड कापणे, दगड फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणारे
  • थॅटचर किंवा लोहार किंवा सेवर किंवा कॉलर
  • बांधकामाच्या ठिकाणावरील सुरक्षा रक्षक
  • वेल्डर
  • बेल सिंकर
  • वूडन किंवा स्टोन पॅकर
  • समुद्राच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम करणारे
  • चुनाभट्टीचे काम करणारे
  • व इतर बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र आहेत

बांधकाम कामगार योजनेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट आकारातील 3 फोटो
  • अर्जदाराचा जन्म प्रमाणपत्र (जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
  • नियोक्त्याचे मागील वर्षभरात ९० दिवस किंवा ९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला
  • पॅन कार्ड
  • राशनकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड (राशनकार्डमधील सर्व सदस्यांचे)
  • मतदान ओळखपत्र
  • रहिवाशी पुरावा
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • ग्रामपंचायत ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • नोंदणी फी- रू. 25/- व वार्षिक वर्गणी रू.60/- (5 वर्षाकरिता) व मासिक वर्गणी रु.1/-

 

माहिती स्रोत :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ

अधिकृत सकेतस्थळ :- https://mahabocw.in/mr/

फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...